नेवासा – भेंडा (ता.नेवासा) येथील हरिष रामदास वाघमारे यांना वर्ल्ड चैरिटी वेल्फेअर फाऊंडेशन, दिल्ली यांच्यावतीने देण्यात येणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार – 2023 देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
वाघमारे यांनी वृक्ष लागवड, संवर्धन व जनजागृती, पाणी बचत मोहीम, पर्यावरण संबंधित केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी हा पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले आहे.
आजतागायत त्यांना आंतरराष्ट्रीय- राज्यस्तरीय अनेक पुरस्कार मिळाले आहेत. या पुरस्काराबद्दल त्यांचे विविध मान्यवरांनी अभिनंदन केले.