कृष्णदेव खराडे ः घरात बसून लोकांचा इंटरनेटचा वापर वाढलाअवसरी, दि. 8 (वार्ताहर) -ग्रामीण भागात आता फेक लिंकचा सुळसुळाट झाला आहे. या अनोळखी लिंक ओपन करू नयेत. कारण त्यातून नागरिकांची आर्थिक लूट होऊ शकते असे आवाहन मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांनी केले आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे घरात बसून असलेल्या लोकांचा इटरनेटचा वापर वाढला आहे. या कालावधीत फेकलिंक व्हायरल होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे, त्यामुळे नागरिकांनी यापासून सावध राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे. या “फेकलिंक’मधून नागरिकांची फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सध्या प्रधानमंत्री बेरोजगार भत्ता योजनेमध्ये नोंदणी करून महिन्याला 3500 रुपये देण्याचे आमीष दाखवणारी लिंक समाज माध्यमावर फिरत आहे. फ्री नेटफिक्ससाठी लिंकही सर्वत्र फिरत आहे. ती 20 लोकांनी किंवा 5 ग्रुपवर पाठविल्यास फ्री नेटफिक्स मिळेल, असे आमीष दाखवले जात आहे.
काही मोबाइल सर्व्हिस देणाऱ्या कंपनीकडून फ्री रिचार्ज मिळणार, असे फसवे संदेश देखील सध्या फिरत आहेत. याबरोबरच नागरिकांना त्यांच्या मोबाइलवर कॉल करून सांगितले जाते की, ईएमआयची तारीख वाढवून दिली जाईल, तरी आपल्या मोबाइलवर आलेला ओटीपी शेअर करा. असे करून त्यांच्या अकौंटमधून रक्कम काढली जाऊ शकते. त्यामुळे यांसारख्या फसव्या लिंक ओपन करू नयेत.
आपला ओटीपी शेअर करू नये, अनोळखी ऍप्स डाउनलोड करून नयेत, असुरक्षित वेबपेज तसेच, वेगवेळ्या प्लॅटफॉर्मचा वापर टाळावा असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात येत आहे. अशा संशयित लिंकबाबत ुुु. ीशिीींहिळीहळपस.ळप आणि ुुु.लूलशीलीळाश.र्सीें.ळप वर तक्रार करावी, असे आवाहन करण्यात येत आहे