नवी दिल्ली : जॅकीचंद सिंहच्या दोन गोलच्या जोरावर एफसी गोवा संघाने बुधवारी झालेल्या ‘इंडियन सुपर लीग’ मधील सामन्यात ओडिशा एफसी संघाचा ४-२ ने पराभव केला. या विजयासह एफसी गोव्याचा संघ गुणतालिकेत अव्वलस्थानी विराजमान झाला आहे.
.@OdishaFC taste defeat for the first time at the Kalinga Stadium!#OFCFCG #HeroISL #LetsFootball pic.twitter.com/qwWFjCK2nA
— Indian Super League (@IndSuperLeague) January 29, 2020
एफसी गोवाने २१ मिनिटाला विनीत राय याच्या आत्मघाती गोलमुळे १-० अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर जॅकीचंदने २४ व्या मिनिटाला आणि २६ व्या मिनिटाला गोल करत गोवा संघास ३-० असे आघाडीवर नेले. पहिल्या सत्रापर्यत त्यांनी ही आघाडी कायम राखली.
त्यानंतर ओडिशाकडून मॅनुएल ओनवुने ५९ व्या आणि ६५ व्या मिनिटाला गोल करत पुनरागमन केलं पण ते बरोबरी साधू शकले नाही. त्यानंतर गोवा संघाकडून फेरियन कोरोमिनास याने ९० व्या मिनिटाला गोल करत विजय निश्चित केला.
एफसी गोवा संघाचा हा ९ वा विजय आहे. त्याचे ३० गुण झाले असून गुणतालिकेत ते अव्वलस्थानी पोहचले आहेत तर एटीकेचा संघ २७ गुणांसह दुस-या स्थानी आहे. ओडिशा एफसी संघाचा हा ६ वा पराभव असून २१ गुणांसह ते चौथ्यास्थानी कायम आहे.