दिल्ली गोळीबार : पोलिस प्रेक्षकासारखे पहात होते

प्रत्यक्षदर्शी आमनने कथन केला थरार
नवी दिल्ली : जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाजवळ निदर्शकांवर गोळीबार करण्यासाठी आलेल्या हल्लेखोराकडे हाताची घडी घालून दिल्ली पोलिस शांतपणे बघत उणे राहिले होते, अशी आठवण प्रत्यक्षदर्शींनी सांगितली. एका सशस्त्र हल्लेखोराने पिस्तूलातून गोळी झाडली. त्यात मास कम्युनिकेशनच्या मास्टर डीग्रीचा विद्यार्थी जखमी झाला.

जखमी विद्यार्थ्याचे नाव शबाद नजर असे आहे. शबादला एम्स रुग्णालयाच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. ही घटना घडली त्यावेळी शबाद त्याच्या सोबत असणारी तृतीय वर्ष अर्थशास्त्राला शिकणारी जामियाची विद्यार्थीनी आमन आसिफ या घटनेबद्दल सांगत होती. दिल्ली पोलिस या घटनेचे थंड प्रेक्षक बनले होते. त्यानंतर तिचा मित्र शबादवर कशी गोळी झाडली याचा प्रत्यक्ष थरार तिने कथन केला.

बॅरीकेड आणि पोलिस असणाऱ्या होली हॉस्पिटलच्या दिशेने हा सशस्त्र माणूस आला. या व्यक्तीला रोखा म्हणून आम्ही पोलिसांना ओरडून सांगत होतो आणि पोलिस फक्त उभे राहून बघत होते. आम्ही हल्लेखोराला शांत होण्यास सांगत होतो. पण, त्याने गोळी झाडलीच. त्याने जमावाच्या दिशेने गोळी झाडली. ती गोळी शबादच्या हाताला लागली, असे तीने सांगितले.

मदतीसाठी ओरडलो; दिल्ली पोलिसांनी नाकारले

जेव्हा हे घडले तेव्हा आम्ही (शबाद आणि मी) एकत्रच होतो. तेथे काय घडले त्याची मी प्रत्यक्षदर्शी आहे. जामिया ते राजघाट असा मोर्चा काढत होतो. मोर्चाला सुरवात झाली. अचानक हा माणूस हातात रिव्हॉलव्हर हातात घेऊन आला. त्याने जोर जोरात ओरडायला सुरवात केली. तो खूप संतापलेला आणि बेभान झाला होता. त्याल कोणीच नियंत्रणात आणू शकत नव्हते. आम्ही सर्व जण त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत होतो. कारण आमच्यापैकी कोणालाच निदर्शनाच्या ठिकाणी वाद नको होते,असे या बहाद्दर विद्यार्थीनीने सांगितले.

दिल्ली पोलिस कसे ढिम्म होते हे सांगताना ती म्हणाली, आम्ही आम्ही मदतीसाठी ओरडत होतो. त्याला थांबवण्यास सांगत होतो. त्याला ताब्यात घ्यायला सांगत होतो. पण त्यांनी काहीही केले नाही.
हल्ल्रखोर आमच्यापैकी नव्हताच. त्याला आमच्यापैकी कोणीच ओळखत नव्हते. तो बाहेरचा कोणीतरी होता, असे आमनने सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.