काजल अगरवाल सध्या खूप सावधपणे पावले टाकते आहे. अलीकडेच तिने उमा नावाच्या एक व्यक्तिरेखा असलेला एक सिनेमा स्वीकारला आहे. काजलने या सिनेमासाठी खूप जास्त मानधनाची मागणी केली आहे.
तिने या सिनेमासाठी 2 कोटी रुपयांची मागणी केली आहे, असे समजते आहे. काजलने फिल्मी करिअरमध्ये प्रथमच एवढ्या मोठ्या रकमेची मागणी केली आहे. काजल लवकरच तमिळमधील “पेरिस पेरिस’मध्ये दिसणार आहे.
हिंदीतील गाजलेल्या “क्वीन’चा हा तमिळ रिमेक असणार आहे. करोनाच्या लॉकडाऊनच्या कारणामुळे हा सिनेमा अद्याप रिलीज झालेला नाही. त्यामुळे काजल खूप काळजीपूर्वक सिनेमांची निवड करते आहे.
तेलगूमधीत 5-6 महिला केंद्रित सिनेमांना तिने नकार दिला आहे. काजलने वेगवेगळ्या भाषांमध्ये अक्षय कुमार, महेश बाबू, चिरंजीवी आणि विशालपर्यंत अनेक हिरोंबरोबर काम केले आहे.
गौतम किचलूबरोबर लग्न झाल्यानंतर तिने आपल्या सिनेमांची निवड अधिक कडक करण्याचे ठरवले आहे. त्याचाच भाग म्हणून तिने आता आपले मानधनदेखील वाढवले आहे.