मुंबई – सुप्रसिद्ध टीव्ही होस्ट ‘मनीष पॉल’ लवकरच OTT वर पदार्पण करणार आहे. मनीष पॉल सध्या त्याच्या ‘रफुचक्कर’ या वेब सीरिजच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकताच रफुचक्करचा ट्रेलर रिलीज झाला असून त्यात मनीष पॉल तब्बल पाच वेगवेगळ्या पात्रांमध्ये दिसत आहे.
मात्र, यासाठी त्याला खूप मेहनतही घ्यावी लागली. आता मनीष पॉलचा एक फोटो समोर आला आहे, ज्यामध्ये त्याचे धक्कादायक परिवर्तन (ट्रांसफॉर्मेशन) झाल्याचे दिसत आहे.
रफुचक्करमध्ये मनीष पॉलने एकीकडे जाड पोट असलेल्या तर दुसरीकडे तंदुरुस्त माणसाची भूमिका साकारली आहे. मनीषने यासाठी खूप परिश्रम घेतले. प्रथम त्याने 10 किलो वजन वाढवले आहे. आणि त्यासाठी त्याने भरपूर खाल्ले आणि प्याले. यानंतर त्याने अडीच महिन्यांत 15 किलो वजन कमी केले आणि तो पूर्णपणे तंदुरुस्त झाला.
एका मुलाखतीत मनीष पॉलने सांगितले की, “तो नेहमीच फिटनेस फ्रीक आहे. जरी तो यासाठी जास्त जिममध्ये जात नसला तरी, मनीष आरोग्यदायी सवयी नेहमीच अवलंबतो. आता रफुचक्करने मनीष पॉलला रोलर कोस्टर राईड दिली आहे.
या मालिकेत मनीष पॉल 5 वेगवेगळ्या व्यक्तिरेखांमध्ये दिसणार आहे. ज्यामध्ये ठग पवन कुमार बावरियाच्या भूमिकेसाठी त्याने आपले वजन 10 किलोने वाढवले होते. यानंतर, त्याने आपले वजन कमी केले आणि जिम ट्रेनरच्या भूमिकेसाठी शरीर तयार केले.
दरम्यान, मनीष पॉल त्याच्या उत्कृष्ट होस्टिंग आणि मजेदार शैलीने ओळखला जातो. सलमान खानपासून ते करण जोहरपर्यंत मनीषने बॉलिवूडमधील बड्या स्टार्ससोबत शो होस्ट केले आहेत. आज पासून (दि. 15) मनीष पॉलची ‘रफुचक्कर’ ही मालिका जिओ सिनेमावर प्रदर्शित होणार आहे.