फारुख अब्दुल्ला यांना सामाजिक सुरक्षा कायद्याखाली अटक

श्रीनगर – जम्मू काश्‍मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ल यांना आज सामाजिक सुरक्षा कायद्याखाली अटक करण्यात आली. जम्मू काश्‍मीरचा विशेष दर्जा असलेले 370 कलम केंद्र सरकारने रद्द केल्यावर 5 ऑगस्टपासून फारुख अब्दुल्ला यांना स्थानबद्ध करण्यात आले आहे. मात्र रविवारी त्यांना सामाजिक सुरक्षा कायद्याखाली अटक करण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

जम्मू काश्‍मीरचे तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या अब्दुल्ला यांना त्यांच्या गुपकार रोडवरील घरातच कैदेत ठेवण्यात आले आहे. त्यांच्या घरालाच तात्पुरते तुरुंग घोषित करण्यात आले आहे, सामाजिक सुरक्षा कायद्याचे दोन प्रमुख विभाग आहेत. सामाजिक सुरक्षा आणि राज्याच्या सुरक्षेस धोका हे ते दोन विभाग आहेत.

त्यामधील सामाजिक सुरक्षेच्या विभागांतर्गत अब्दुल्ला यांना अटक केली गेली आहे. सामाजिक सुरक्षा कायद्याखली अटक केल्यावर खटल्याशिवाय 6 महिन्यांपर्यंत आणि व्यक्‍तीला ताब्यात ठेवण्याची तरतूद आहे. दुसऱ्या विभागानुसार ही मुदत 2 वर्षांची आहे. श्रीनगरचे खासदार असलेले फारुख अब्दुल्ला हे या कायद्याखाली अटक झालेले जम्मू काश्‍मीरचे पहिलेच मुख्यमंत्री आहेत.
चौकट

अब्दुल्ला यांच्या सुटकेसाठी वैको यांचे प्रयत्न

स्थानबद्धतेला आव्हान देणाऱ्या एमडीएमके पक्षाचे नेते वैको यांनी ही याचिका दाखल केलेल्या याचिकेला उत्तर देण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि जम्मू काश्‍मीर प्रशासनाला केली होती. त्याच्या दुसऱ्याच दिवशी अब्दुल्ला यांना अटक करण्यात आली आहे. चेन्नईमधील कार्यक्रमाला अब्दुल्लाअ यांना उपास्थित रहाता यवे यसठी त्यांची सुटका करण्यात यावी अशी मागणी वैको यांनी केली आहे. वैको आणि अब्दुल्ला हे चार दशकांपासून जवळचे मित्र आहेत. अब्दुल्ला यांचे चिरंजीव आणि जम्मू काश्‍मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्यासह आणखी एक माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्यासह आणखी काही नेत्यांना 5 ऑगस्टपासून स्थानबद्ध करण्यात आले अहे.

Leave A Reply

Your email address will not be published.