किसान क्रेडिट कार्डवर मिळणार शेतकऱ्यांना कर्ज

दिल्ली : शेतकर्‍यांना आता किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) वर कोणत्याही हमीभावाशिवाय सुमारे 1.60 लाख रुपयांचे कर्ज मिळणार आहे. पूर्वी शेतकर्‍यांना केवळ 1 लाख रुपयांचे कर्ज मिळत होते.

कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री कैलाश चौधरी यांच्या मते, किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) च्या माध्यमातून हे कर्ज शेतकऱ्यांना मिळू शकेल.
ते म्हणाले की शेतकरी सावकारांच्या तावडीत अडकू नये म्हणून सरकार हमीभावाने कर्ज देत आहे.

चौधरी म्हणाले की, वेळेवर पेमेंट केल्यास शेतकर्‍यांना तीन लाख रुपयांच्या मर्यादेपर्यंत चार टक्के व्याजदराने कर्ज मिळेल. बँकांकडून कर्जासाठी अर्ज सादर केल्याच्या 15 दिवसांच्या आत केसीसी अंतर्गत कर्ज देण्याचे निर्देश बँकांना देण्यात आले आहेत. बँकांचे सर्व प्रक्रिया शुल्क देखील समाप्त करण्यात आले आहे. केसीसी अंतर्गत पशुसंवर्धन व मत्स्यपालन करणाऱ्या शेतकर्‍यांना दोन लाखांपर्यंत कर्ज देण्याची सुविधादेखील देण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.