यवतमाळ: विदर्भातील यवतमाळ जिल्यातील एका शेतकऱ्याने भाजप-शिवसेनेला जबाबदार ठरवून आत्महत्या केली आहे. शेतकऱ्याच्या मृतदेहाजवळ मिळालेल्या एका सुसाईड नोटमध्ये त्याने सत्ताधारी पक्ष भाजपा आणि शिवसेनेला यासाठी जबाबदार धरले आहे.
धनराज बळीराम नवहटे (वय ५२) यांनी सातत्याने होणाऱ्या पीक नुकसानीला आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. ते यवतमाळ जिल्ह्यातील पंढरवाडा तालुक्यात पहापाल गावचे रहिवासी आहेत. नवहटे यांच्याजवळ पाच एकर जमीन होती, शेतीसाठी त्याने स्थानिक सावकाराकडून दोन लाख रुपये कर्ज घेतले होते.
मिळालेल्या वृत्तानुसार, सदर शेतकऱ्याने आपल्या सुसाईड नोटमध्ये भाजपा आणि शिवसेनेला जबाबदार धरले आहे. त्यांचा मृतदेह जवळच्या एका शेतामध्ये आढळून आला. मिळालेल्या माहितीनुसार नवहटे यांनी विष प्राशन करुन आत्महत्या केल्याचे स्पष्ट होते.