मुंबई – टाटा मोटर्स संचलित जग्वार लॅंड रोव्हर ही कंपनी या वर्षापासूनच भारतात इलेक्ट्रिक वाहने सादर करणार आहे. यात हायब्रीड आणि बॅटरीवरील वाहनांचा समावेश आहे.
2019 च्या शेवटी ही कंपनी भारतात पहिले हायब्रीड वाहन तर पुढच्या वर्षी पहिल्या सहा महिन्यात बॅटरीवरील वाहन सादर करील. पुढील अनेक वर्षे या क्षेत्रात कंपनी जास्त काम करणार आहेत. भारत सरकारही अशा वाहनांना चालना देत आहे. याचा सदुपयोग करण्याची तयारी आम्ही सुरू केली असल्याचे इंडियाचे अध्यक्ष रोहित सुरी यांनी सांगितले. केंद्र सरकारने गेल्या महिन्यात फेम दोन्ही योजना सादर केली आहे. यामुळे भारतातील इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वेगाने वाढण्याची शक्यता आहे.