औरंगाबाद : काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून औरंगाबाद लोकसभेसाठी आज त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अब्दुल सत्तार यांच्या उमेदवरीमुळे काँग्रेस समोरचं आव्हान वाढलं आहे. तसेच काँग्रेस उमेदवार सुरेश झांबड यांना त्यांचा खूप मोठा फटका बसू शकतो.
औरंगाबाद लोकसभा मतदार संघातून काँग्रेसने आमदार सुभाष झांबड यांना बी फाॅर्म दिल्याने त्यांची उमेदवारी निश्चित झाली आहे, तसेच तेच काँग्रेसचे अधिकृत उमेदवार असतील हे नक्की झाले आहे.
काही दिवसांपासून औरंगाबादच्या उमेदवारीवरून वाद सुरू होता. सुरेश झांबड यांना उमेदवारी जाहीर झाल्याने नाराज झालेल्या आमदार अब्दुल सत्तार यांनी काँग्रेस जिल्हा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तसेच उमेदवारी न दिल्यास बंडखोरी करेल, असा इशारा सत्तार यांनी काँग्रेसला दिला होता. त्यामुळे नाराज असलेल्या सत्तार यांनी आज बंड करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला असून, अब्दुल सत्तार यांच्या उमेदवरीमुळे काँग्रेस समोरचं आव्हान वाढलं आहे. काँग्रेस पक्ष आता सत्तार यांची मनधारणी करूनअर्ज मागे घ्यायला लावणार ? की सत्तार यांच्या आव्हानाचा सामना करणार..? हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.