Farmer Protest – सध्या सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत हेही आता सक्रिय झाले असून त्यांनी सांगितले की, संयुक्त किसान मोर्चाची एक महत्त्वपूर्ण बैठक गुरुवारी नियोजित आहे, जिथे देशभरातील शेतकरी आंदोलनाची पुढील दिशा ठरवून निर्णय घेणार आहेत. । Farmer Protest
टिकैत यांनी जाहीर केले आहे की शेतकऱ्यांच्या महत्त्वपूर्ण मागण्यांचे निवेदन राज्य आणि केंद्र सरकारला सादर केले जाईल. एमएसपी हमी, वीज दुरुस्ती विधेयक आणि स्वामीनाथन समितीच्या अहवालाची अंमलबजावणी हे आमचेही प्रमुख मुद्दे आहेत. । Farmer Protest
एमएसपीवर हमी न मिळाल्यास संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना आंदोलन तीव्र करण्याखेरीज पर्याय नाही असे ते म्हणाले. कृषी क्षेत्रात खासगी कंपन्यांना वाव दिला जाऊ नये अशी जोरदार मागणी त्यांनी केली. ते म्हणाले की आम्ही हे आंदोलन अधिक व्यापक करण्यावर गुरूवारी चर्चा करून निर्णय घेऊ.