फरहान अख्तरचा “तुफान’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर 21 जून रोजी रिलीज होणार आहे. त्याचा “स्काय इज पिंक’ हा 2019 मधला हिट ठरलेला सिनेमा होता. त्याने “भाग मिल्खा भाग’ मधून आपल्या अभिनयाबरोबर कठोर परिश्रमही दाखवून दिले होते. आता “तुफान’च्या निमित्ताने तो पुन्हा एकदा स्पोर्टस ड्रामा प्रेक्षकांच्या समोर घेऊन येणार आहे.
View this post on Instagram
तो केवळ अभिनय करत नाही, तर पात्र जिवंत करतो. म्हणूनच “तुफान’च्या नायकासाठी तो सर्वोत्तम असल्याचे आपल्याला वाटले होते, असे निर्माता राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी सांगितले. “तुफान’ची कथा एका मुष्टियोद्ध्याची असणार आहे.
View this post on Instagram
एवढेच नव्हे तर कम्फर्ट झोनमधून बाहेर येऊन आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ती एक प्रेरक कथा असेल. “तुफान’ गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये रिलीज होणार होता. मात्र करोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे इतर अनेक सिनेमांचे वेळापत्रक बिघडले, तसे “तुफान’चेही वेळापत्रक बिघडले.
View this post on Instagram
“तुफान’च्या लीड रोल व्यतिरिक्त फरहान या सिनेमाचा एक निर्माताही आहे. याशिवाय “शर्माजी नमकीन’ची निर्मितीही तो करतो आहे. ऋषी कपूर यांच्या निधनामुळे हा सिनेमा रखडला होता. आता ऋषी कपूर यांचा अर्धवट राहिलेला रोल परेश रावल पूर्ण करणार आहे.