मुंबई – प्रसिद्ध चित्रपट निर्माती-कोरियोग्राफर फराह खान आणि बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान यांच्यात खूप चांगली मैत्री आहे. हे इंडस्ट्रीसह चाहत्यांना देखील माहिती आहे.दोघांनीही एकमेकांच्या आयुष्यात आलेले चढउतार खूप जवळून पाहिले आहेत आणि नेहमीच एकमेकांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. अशाच एका घटनेची आठवण करून, फराह खानने शाहरुख मदतीला धावून आल्याचा किस्सा सांगितला आहे. एकदा फराह शाहरुखला फोन करून आपली व्यथा सांगत होती त्यावेळी तिला अक्षरशः रडू कोसळलं. आणि ती फोनवर सुमारे अर्धा तास रडत होती.
दुसऱ्या बाजूने फोनवर असलेल्या शाहरुखने आपली मैत्रीण फराहसाठी शूट थांबवले आणि तो तिच्याशी गप्पा मारू लागला. त्याला फराहचा प्रॉब्लेम समजताच ती शूटिंग सोडून थेट तिच्या घरी पोहचला.यावेळी किंग खान तासभर फराहच्या बाजूला बसून तिच्याशी बोलत राहिला आणि त्याने तिला धीर दिला. अशी आठवण फराहने एका मुलाखती दरम्यान सांगितली.
फराहने एका मुलाखतीदरम्यान शेअर केले, ‘माझ्या वडिलांचे निधन झाले होते, पण त्यांनी शाहरुखला माझी काळजी घेण्यासाठी पाठवले आहे. मला शाहरुखचे आभार मानायचे आहेत कारण त्याने माझी खूप काळजी घेतली आहे. मला अजूनही आठवतंय की मी खूप वर्षांपूर्वी भावनिक आघातातून जात होतो, तेव्हा फक्त शाहरुख माझ्यासोबत होता आणि केवळ त्याच्यामुळे मी सावरू शकले.
फराहने शाहरुख खानसोबत ‘मैं हूं ना’, ‘ओम शांती ओम’ आणि ‘हॅपी न्यू इयर’ सारख्या चित्रपटात काम केले आहे. मात्र, तेव्हापासून दोघांनी व्यावसायिकपणे एकत्र काम केले नाही. याआधी एका मुलाखतीत याबाबत चर्चा करताना फराह म्हणाली होती की, योग्य वेळ आल्यावर दोघेही पुन्हा कोणत्या ना कोणत्या प्रोजेक्टवर एकत्र काम करतील.
दुसरीकडे, शाहरुख खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ‘पठाण’ चित्रपटाच्या यशानंतर तो लवकरच ‘जवान’मधून मोठ्या पडद्यावर धमाकेदार प्रदर्शन करण्यास तयार आहे. चित्रपटात SRK व्यतिरिक्त नयनतारा, विजय सेतुपती आणि सान्या मल्होत्रा सारखे स्टार्स मुख्य भूमिकेत आहेत. शाहरुख राजकुमार हिरानीच्या डँकी या चित्रपटातही दिसणार आहे.