पुणे – गौरव घुले मित्र परिवारच्या वतीने दीपावलीच्या निमित्ताने बिबवेवाडी परिसरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणजे “स्वप्नील बांदोडकर लाईव्ह इन कॉंसर्ट’ या स्वरसंध्या आयोजित आंनदोत्सव कार्यक्रमास रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
गेल्या दोन वर्षांपासून करोनाच्या संकटामुळे आपले सण, उत्सव मोठ्या प्रमाणात कुणालाच साजरे करता आले नाही. यावर्षी सर्वांनी मिळून दीपावली साजरी करूया या हेतूने परिसरातील प्रत्येक घरात दीपावलीची भेटवस्तू वैयक्तिक भेट देऊन देण्यात आली. त्यानंतर नुकतेच बिबवेवाडी येथील बिबवेवाडी प्राथमिक शाळेच्या प्रांगणात स्वप्नील बांदोडकर लाईव्ह इन कॉंसर्टचे आयोजन करण्यात आले होते.
या सांस्कृतिक कार्यक्रमात अनेक नागरिकांनी सहभागी होऊन आनंदोत्सवाचा आनंद लुटला. यावेळी आमदार माधुरी मिसाळ, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, वरीष्ठ पोलीस निरीक्षक झांबरे, तसेच भाऊसाहेब भोईर, सचिन घुले, गणेश घुले आदी मान्यवर उपस्थित होते.