बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटनीने पुन्हा एकदा आपल्या डान्स परफॉर्मन्सने चाहत्यांची मन जिंकून घेतली आहेत. दिशाचे एक नवीन गाणे नुकतेच यू ट्यूबवर रिलीज झाले असून त्यामध्ये “मेरे नसीब में..’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.
View this post on Instagram
हे गाणे यू ट्यूबवर अपलोड होताच व्हायरल झाले असून काही तासातच तब्बल दोन लाख लोकांनी ते पाहिले आहे. दिशा पटनी या गाण्यामध्ये डान्सिंग पार्टनर डिंपल कोटेचासोबत थिरकताना दिसत आहे.
View this post on Instagram
दिशाचे हे आवडते गाणे 1980 सालातील असून या गाण्याचे अनेक रिमेक बनले आहे. गाण्यामध्ये संगीत फार दमदार आहे. दिशाच्या या गाण्याची कोरिओग्राफी अंकन सेनने केली आहे. दिशाचा हा व्हिडिओ 1 मिनिट 24 सेकंदांचा आहे.
View this post on Instagram
हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस पडला आहे. अभिनेत्री दिशा पटनीला सोशल मीडिया क्वीन म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. दिशा सोशल मीडियावर खूप ऍक्टिव असते. ती चाहत्यांसाठी नेहमीच फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. तिने शेअर केलेले फोटो आणि व्हिडिओ काही वेळातच सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असतात.