बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या लग्नाची काही दिवसांपासून चित्रपटसृष्टीत जोरदार चर्चा सुरू आहे. श्रद्धा रोहन श्रेष्ठला डेट करत असल्याची चर्चा आहे. रोहन श्रेष्ठ हा भारतातील दिग्गज फोटोग्राफर राकेश श्रेष्ठ यांचा मुलगा आहे.
View this post on Instagram
रोहन आणि श्रद्धा एकमेकांना दोन वर्षांपासून ओळखत असून ते 2018 पासून एकमेकांना डेट करत असल्याचे बोलले जात आहे. आता ते दोघं लग्न करणार असल्याच्या देखील चर्चा सुरू आहेत. याच चर्चेदरम्यान श्रद्धा कपूरने आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे. “प्रपोज डे’ दिवशी श्रद्धा कपूरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अशी पोस्ट केली आहे. ज्यामुळे सर्वांची उत्सुकता आता अधिक वाढली आहे.
View this post on Instagram
श्रद्धाने केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, उद्या संध्याकाळी 6.30 वाजता मी खूप स्पेशल अनाउन्समेंट करणार आहे. श्रद्धाची ही अनाउन्समेंट नक्की काय असणार आहे, याची प्रतीक्षा आता तिच्या चाहत्यांना लागली आहे. नुकतेच वरुण धवनचे लग्न झाले आहे. त्यावेळी श्रद्धाने त्याला इन्स्टाग्रामवर शुभेच्छा दिल्या होत्या. यानंतर वरुणने तूदेखील लग्न करण्यास तयार असशील, असे म्हटले होते. त्यामुळे श्रद्धा आणि रोहन लग्न करणार असल्याचा अंदाज बांधला जात आहे.