अभिनेत उपेंद्र लिमयेने आपल्या कसदार आवाज आणि दमदार अभिनय कौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर स्वत:ची वेगळी छाप उमटवली आहे. चोखंदळ भूमिकांसाठी ओळखला जाणारा उपेंद्र सध्या गायक संगीतकाराच्या भूमिकेत झळकणार आहेत. हार्मोनियम सोबतचा फोटो बघून सध्या ते गायक-संगीतकार झाले आहेत का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
नेहमीच विविधांगी भूमिका साकारणारा उपेंद्र पुन्हा एकदा “प्रीतम’मध्ये एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. त्यासाठीच त्याने हर्मोनियमवर आलाप आणि ताना घेत गाण्याचा सूर धरला आहे. संगीतातील त्यांचे हे नवीन पाऊल आगामी “प्रीतम’ या चित्रपटातील एका गाण्यासाठी असून उपेंद्र लिमयेचा हा हटके अंदाज चाहत्यांना पाहावयास मिळणार आहे.
या चित्रपटात उपेंद्र लिमयेसह प्रणव रावराणे आणि नक्षत्रा मेढेकर ही फ्रेश जोडी पाहायला मिळणार आहे. अजित देवळे, विश्वजीत पालव, समीर खांडेकर, आभा वेलणकर, शिवराज वाळवेकर, अस्मिता खटखटे, नयन जाधव, आनंदा कारेकर हे कलाकार चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. “प्रीतम’ चित्रपटाची निर्मिती फैजल नितीन सिजो यांनी केली आहे. “ऍड फिल्म मेकर’ सिजो रॉकी यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. चित्रपटाची गीते गुरू ठाकूर यांनी लिहिली आहेत. पार्श्वसंगीत विजय गावंडे यांचे असून शंकर महादेवन, अभय जोधापूरकर, मनिष राजगिरे यांचा स्वरसाज चित्रपटातील गाण्यांना लाभला आहे.