छोट्या पडद्यावरील अभिनेत्री चाहत खन्ना सध्या खूपच प्रसिद्धीच्या झोतात आहे. लॉकडाऊनच्या काळात गायक मिका सिंहमुळे चर्चेत आल्यानंतर तिने डिप्रशेनवर खुलेपणाने मत व्यक्त केले होते. यानंतर चाहतने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे, जो बाथरूम सेल्फी आहे. या फोटोत चाहत मिरर सेल्फी घेत असताना खूपच बोल्ड आणि हॉट दिसते.
या फोटोत चाहत क्रॉप टॉपमध्ये दिसते. या फोटोसह अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये फक्त बटरफ्लाय इमोजी शेअर केल्या आहेत. हा फोटो शेअर केल्यानंतर चाहत्यांनी त्याला खूप लाइकस् दिल्या असून हजारो जणांनी टिप्पणीही केली आहे.
याशिवाय अभिनेत्रीने गरिबांसाठी अनोख्या पद्धतीने मदत केल्यानेही ती चर्चेत आहे. वास्तविक, करोना व्हायरसच्या या संकटाच्या काळात गोरगरिबांना मदत करण्यासाठी चाहतने एकच वेळ जेवणाचा निर्णय घेतला. “बडे अच्छे लगते है’ फेम अभिनेत्री चाहत म्हणाली, जर आपण सर्वांनी कमी खाण्याची प्रतिज्ञा करून गरजूंना आधार दिल्यास कोणीही भुकेले राहणार नाही. आपण सर्वांनी एक देश म्हणून काम केल्यास कुणीही उपाशीपोटी झोपणार नाही. दरम्यान, चाहता खन्नाने काही दिवसांपूर्वी डिप्रेशनवर मनमोकळेपणाने गप्पा मारल्या होत्या. तसेच डिप्रेशनला तिने कसे हरविले, तेही सांगितले होते.