मुंबई – छोट्या पडद्यावरील अभिनेत्री रुबिना दिलैकचा अपघात झाला आहे. सुदैवाने ती थोडक्यात बचावली आहे. मात्र तिच्या कारचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर तिला लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुबिनाचा पती अभिनव शुक्लाने ट्वीट करत अपघाताची माहिती दिली आहे.
अभिनव शुक्लाने चालकावर संताप व्यक्त केला आहे. त्याने ट्वीट करत लिहिले की, “आज आमच्यासोबत घडले आहे. उद्या तुम्हाला या गोष्टींचा सामना करावा लागू शकतो. ट्रॅफिक लाइट जंप करणाऱ्या मूर्खांपासून सावध रहा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो हसत उभा होता. सविस्तर नंतर सांगेल. रुबिना कारमध्येच होती. आता तिची प्रकृती ठीक असून तिला डॉक्टरांकडे घेऊन जात आहे.”
यावेळी त्याने मुंबई पोलिसांना चालकावर कठोर कारवाई करण्याची विनंती देखील केली आहे. यासोबतच त्याने एक अपघात झालेल्या गाडीचा देखील फोटो शेअर केला आहे. यात तिच्या कारचे मोठे नुकसान झाल्याचे दिसते. रुबिनाच्या अपघाताची बातमी मिळल्याने तिचे चाहते चिंता व्यक्त करत आहेत. त्यामुळे रुबिनाच्या पतीन तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली.
Happened to us, can happen to you. Beware of idiots on the phone jumping traffic lights. To top it up standing there smiling. More details later. Rubina was in car she is fine, taking her for medical. @MTPHereToHelp @MumbaiPolice request you to take strict action ! @RubiDilaik pic.twitter.com/mOT5FPs4Vo
— Abhinav Shukla (@ashukla09) June 10, 2023
View this post on Instagram
दरम्यान , रुबिनाला ‘शक्ति अस्तित्व के एहसास’ या मालिकेतून प्रसिद्धीच्या झोतात आली. त्यानंतर ती ‘बिग बॉस 14’, ‘खतरों के खिलाडी 12’ आणि डान्स रिअॅलिटी शो ‘झलक दिखला जा सीझन 10’च्या मंचावरही दिसली.