बसथांब्यांवरील वेळापत्रकच देतेय धोका

File Photo

वेळापत्रकावरील वेळ आणि बस धावण्याच्या वेळेत तफावत

पुणे – शहरातील नागरिकांसाठी सर्वात मोठे साधन म्हणून पीएमपी वाहतूक सेवेला प्राधान्य दिले जाते. परंतु, पीएमपी बस वेळेत धावत नसल्याने प्रवाशांची धांदल उडत आहे. बस थांब्यावरील वेळापत्रक व धावत असलेल्या बस या दोघांमध्ये कोणताही समन्वय नसल्याचे दिसून आले आहे. यासाठी अनेकदा चालक-वाहकांना जबाबदार धरण्यात येत. मात्र, बस थांब्यावरील वेळापत्रक सद्यस्थितीला अनुसरुन आहे का? याची चाचपणी करण्याची आवश्‍यकता आहे.

शहरातील स्वारगेट, पुणे स्टेशन, कात्रज, हडपसर, कोथरूड, बालेवाडी, विश्रांतवाडी, आळंदी, वारजे माळवाडी, वाघोली, राजगुरूनगर, चाकण, कोंढवा, मनपा अशा विविध बसस्थानकांतून विविध भागांत जाण्यासाठी बस उपलब्ध आहेत. मात्र, या मार्गावर बस उशीरा धावत असल्याचे प्रवाशांकडून सांगितले जाते. परंतु, या मार्गावरील बस थांब्यावरील वेळापत्रक जुने असल्याचे आढळून आले आहे. बस थांब्यांवरील ठरवून दिलेल्या वेळात निश्‍चित ठिकाणी पोहोचण्यासाठी चालकांची दमछाक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)