पुरामुळे विभागातील 1 हजार 388 घरे पडली

19 हजार घरांची पडझड : डॉ. दीपक म्हैसेकर यांची माहिती

पुणे -पुणे विभागातील पुरामुळे अनेक घरे जमीनदोस्त झाली आहेत. तर काही घरांची पडझड झाली असून, प्रशासनाकडून या घरांचे सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. आतापर्यंत विभागात 1 हजार 388 घरे जमीनदोस्त झाली असून, 19 हजार 381 घरांची पडझड झाली आहे, अशी माहिती विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सर्वेक्षणानुसार सांगली जिल्ह्यात 625 तर कोल्हापूर जिल्ह्यात 747 घरे जमीनदोस्त झाली आहेत. सातारामध्ये 13 आणि पुणे शहरात 3 घरे पडली आहेत. पडझड झालेल्या घरांमध्ये सांगलीमध्ये 3 हजार 228 तर कोल्हापूरमध्ये 11 हजार 765 घरांचा समावेश आहे. तसेच सातारा जिल्ह्यातील

4 हजार 318 आणि पुणे येथील 70 घरांची पडझड झाली आहे.जनावरांच्या गोठ्याचेही मोठे नुकसान झाले असून, विभागातील 545 गोठ्यांची पडझड झाली आहे. त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील 387 तर सांगलीमध्ये 101 गोठे आहेत. सातारामध्ये 54 आणि पुण्यात 73 गोठ्यांची पडझड झाली आहे. दरम्यान, पूरस्थिती आटोक्‍यात आली असून, नागरिकांच्या आरोग्य तपासणीसाठी विभागात 478 वैद्यकीय पथके कार्यरत आहेत. सांगलीमध्ये 237, कोल्हापूरमध्ये 169 आणि सातारा जिल्ह्यात 72 पथके सेवा बजावित आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.