सासवड/दिवे, (प्रतिनिधी) – जे टीका करतात त्यांच्या विश्वासावर सगळे सोपंवल होते त्या विश्वासाला धक्का त्यांनी बसवला त्यामुळे सहाजिकच सर्वांना भेटावे लागत आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले.
दिवे (ता. पुरंदर) येथे माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी माजी राज्यमंत्री व पुरंदरचे माजी आमदार दादा जाधवराव यांची भेट घेतली. दरम्यान, दुष्काळात चारा व पाणी प्रश्नांसंदर्भात अनेक लोक भेटतात.
पण सरकारला आचारसंहिता असल्याने ती संपल्यावर शासन पण यावर निर्णय घेईल, आम्ही पण यात लक्ष घालू मध्यंतरी देखील दादा जाधवराव यांना भेटलो होतो. जे फॉर्म भरल्यानंतर थेट सभा घेत होते ते आता गल्ली बोळात फिरत आहेत, अशी अजित पवार यांनी टीका केली होती. त्याला उत्तर देताना शरद पवार प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
पुरंदरचा आणि बारामतीचा दुष्काळी भागात आचारसंहितेमुळे काही जाहीर करता येत नाही. आचारसंहिता झाल्यानंतर दुष्काळावरती काम होईल दुष्काळासंदर्भात आमच्या सरकारने काम केले होते. आचारसंहिता संपल्यानंतर येथील आमदार यामध्ये लक्ष घालून काम करतील, असे पवार यांनी स्पष्ट केले.
बंद दाराआड काही वेळ चर्चा
काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील घेतली होती दादासाहेब जाधवराव यांची भेट घेतली होती. आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी दादासाहेब जाधवराव यांची भेट घेतल्याने पुरंदर तालुक्यात चर्चांना उधाण आले आहे तर शरद पवार आणि दादासाहेब जाधवराव यांच्यात बंद दाराआड काही वेळ चर्चा झाली.