नवी मुंबई – आज चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना होत आहे. सामन्यास काहीच वेळात सुरूवात होणार असून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
Faf du Plessis wins the toss and #RCB will bowl first against #CSK.
Live – https://t.co/fphsgEEB54 #CSKvRCB #TATAIPL pic.twitter.com/hZO6XpbB3K
— IndianPremierLeague (@IPL) April 12, 2022
बंगळुरूचा कर्णधार डू प्लेसिसने प्लेइंग-11 मध्ये दोन बदल केले आहेत. हर्षल पटेलच्या जागी सुयश प्रभुदेसाई आणि डेव्हिड विलीच्या जागी जोश हेझलवूडचा प्लेईंग-11 मध्ये समावेश करण्यात आला आहे. त्याचवेळी चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार रवींद्र जडेजाने प्लेइंग-11 मध्ये कोणताही बदल केलेला नाही.
दरम्यान, आयपीएलच्या ( IPL 2022) चालू सीझनमध्ये आतापर्यंतची चेन्नईची कामगिरी खूपच निराशजनक राहिली आहे. या संघाने आतापर्यंतचे चारही सामने गमावले आहेत. रवींद्र जडेजाचा संघ आज हा पराभवाचा सिलसिला तोडण्याचा प्रयत्न करेल. विशेष म्हणजे चेन्नई सुपर किंग्जचा हा 200 वा आयपीएल सामना आहे. त्याचवेळी बंगळुरूने पहिला सामना गमावल्यानंतर सलग तीन सामने जिंकले. आज संघ विजयाचा चौकार मारण्यासाठी ते मैदानात उतरतील.
दोन्ही संघांचे प्लेइंग-11 खालीलप्रमाणे –
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : फाफ डू प्लेसिस (कर्णधार), अनुज रावत, विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, वनइंडू हसरंगा, जोश हेझलवूड, मोहम्मद सिराज, सुयश प्रभुदेसाई, आकाश दीप.
चेन्नई सुपर किंग्ज : रॉबिन उथप्पा, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, अंबाती रायुडू, शिवम दुबे, रवींद्र जडेजा (कर्णधार), एमएस धोनी (यष्टीरक्षक), ड्वेन ब्राव्हो, ख्रिस जॉर्डन, महेश टेकशाना, मुकेश चौधरी.