Fadnavis on Ashok Chavan। राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्याबाबतीत मोठी बातमी समोर आलीय. अशोक चव्हण यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्याची राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडालीय. दरम्यान, अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिलीय.
अशोक चव्हाण भाजपमध्ये येणार का, याविषयी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आले. यावर फडणवीस यांनी आगे आगे देखो होता है क्या.. असे सूचक वक्तव्य केले. तसेच “भाजपसोबत अनेक मोठ्या पक्षांचे नेते येऊ इच्छितात. काँग्रेसचे अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत. असेही त्यांनी म्हटले.
काँग्रेसमध्ये नेत्याची घुसमट Fadnavis on Ashok Chavan।
पुढे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या वागणुकीमुळे या नेत्यांची पक्षात घुसमट होत आहे. या नेत्यांना देशातील मुख्य प्रवाहात काम करायचय. पण काँग्रेस नेतृत्त्वाच्या भूमिकेमुळे ते शक्य होत नाही. पण अनेक मोठ्या राजकीय पक्षांचे नेते मोदींच्या नेतृत्वाखाली मुख्य प्रवाहात काम करु इच्छितात. आमच्या संपर्कात कोण, याचा खुलासा लवकरच होईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
नाना पटोलेयांच्या कारभारावर अशोक चव्हाण नाराज Fadnavis on Ashok Chavan।
दरम्यान, अशोक चव्हाण यांच्यासोबत मराठवाड्यातील काही आमदार भाजपमध्ये जाऊ शकतात. याशिवाय, मुंबईतील काँग्रेस नेते नसीम खान आणि चंद्रकांत हंडोरे यांचा समावेश आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेयांच्या कारभारावर अशोक चव्हाण नाराज असल्याचे सांगितले जाते.
प्राप्त माहितीनुसार, अशोक चव्हाण हे काल काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकीला उपस्थित होते. त्यावेळी त्यांची देहबोली फारशी चांगली दिसत नव्हती. परवा त्यांनी काँग्रेसच्या जिल्हा स्तरावरील बैठकीला दांडी मारली होती. गेले दोन दिवस अशोक चव्हाण हे दिल्लीत होते. याठिकाणी भाजप पक्षश्रेष्ठींशी चर्चा केल्यानंतर त्यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा होती. भाजपकडून अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाऊ शकते. आज भाजपची राज्यसभा उमेदवारांची यादी प्रसिद्ध होईल, त्यामध्ये चव्हाणांच्या नावाची शक्यता आहे.