Kiran Rao: बॉलीवूड अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खानचे काही दिवसांपूर्वीच मोठ्या थाटामाटात विवाह संपन्न झाला. यावेळी आमिर खान एक्स वाईफ किरण रावने देखील या सोहळ्यात मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला होता. सध्या दिग्दर्शिका, निर्माती किरण राव ‘लापता लेडीज’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ती अनेक ठिकाणी व्यस्त आहे. मात्र एका मुलाखतीदरम्यान तिने आमिरची एक्स वाईफ म्हटले जात असल्याने संताप व्यक्त केला आहे.
एका मुलाखतीत जेव्हा लोक तुम्हाला आमिरची एक्स वाईफ बोलवतात तेव्हा तुम्हाला काय वाटतं? असा प्रश्न तिला विचारण्यात आला. तेव्हा ती म्हणाली, ” मला खूप विचित्र वाटतं. जेव्हा सार्वजनिक ठिकाणी लोक मला तू आमिरची पत्नी आहेस का?असं विचारायचे तेव्हाही मला ते आवडत नाही. त्यांना कदाचित माहित नाही की मी नक्की कोण आहे आणि काय काम करते? मी फक्त आमिरची पत्नी नाही. माझी स्वत:ची वेगळी ओळख आहे.”
पुढे ती म्हणाली, “मी आणि आमिर चांगले मित्र आहोत. मला त्यांच्यासोबत काम करायला आवडतं. लोक आजही मला आमिरची एक्स वाईफ म्हणतात. पण माझं जेव्हा लग्न झालं होतं तेव्हाही मी माझ्या स्पेसमध्ये होते. माझे मित्र होते. आमिरने कधीच माझ्या स्पेसमध्ये हस्तक्षेप केला नाही.” दरम्यान, किरण राव आणि आमिर खानने 2005 मध्ये लग्न केले होते. तब्बल १६ वर्षांनंतर त्यांनी घटस्फोट घेतला. आजही आमिर आणि किरण एकत्र काम करताना दिसतात. काही दिवसांपूर्वीच त्यांचे एकत्र ट्रीप गेल्याचे फोटोही समोर आले होते.