CoronaUpdate : अनेक राज्यांमधील निर्बंधांना मुदतवाढ

नवी दिल्ली – मागील काही दिवसांपासून करोनाबाधितांची संख्या घटत असल्याने देशाला दिलासा मिळाला आहे. मात्र, सावधगिरीचा उपाय आणि करोना संसर्गाची साखळी तोडण्याचे पाऊल म्हणून अनेक राज्यांनी निर्बंधांना मुदतवाढ दिली आहे.

दिल्ली, बिहार, हरियाणा, ओडिशा, राजस्थान, केरळ, तामीळनाडू, कर्नाटक, तेलंगण या राज्यांत लॉकडाऊन लागू आहे. त्या यादीत शनिवारी पश्‍चिम बंगालची भर पडली. महाराष्ट्रातील लॉकडाऊनसदृश निर्बंध 1 जूनपर्यंत वाढवण्यात आले आहेत.

छत्तिसगढमधील लॉकडाऊन चालू महिन्याच्या अखेरपर्यंत वाढण्याचे संकेत मिळत आहेत. गुजरातमधील रात्रीच्या संचारबंदीची मुदत वाढवण्यात आली आहे. इतर काही राज्यांत लागू असलेल्या निर्बंधांची मुदत काही दिवसांत संपेल. मात्र, ती राज्ये निर्बंधांचा कालावधी वाढवण्याचीच शक्‍यता अधिक आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.