पुणे – आरटीओतील पासिंग, रजिस्ट्रेशनची कामे करून देतोे असे सांगून नागरिकांकडून लाखो रुपये उकळून फरार झालेल्या आरटीओ एजंटला अटक करण्यात पोलिसांच्या गुन्हे शाखेला यश आले. २०१७ पासून तो फरार होता. कामे करून देण्याचे आश्वासन देऊन त्याने अनेक नागरिकांकडून पैसे उकळले आहेत.
विशाल अर्जुन सोनवणे (४१, जांभूळवाडी रोड, कात्रज) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. हायवा गाड्यांचे पासिंग करून देतो म्हणून एका कंपनीकडून त्याने साडेचारलाख रुपये घेतले. त्यानंतर त्यांचे काम करून न देता फसवणूक केली. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा यू्िनट १ कडून सुरू होता. तपासादरम्यान आरोपीने २०१७ पासून अनेक लोकांची फसवणूक केल्याचे समोर आले. याबाबत बंडगार्डन पोलीस ठाण्यात देखील तक्रार दाखल आहेत.
मोठ्या वंâपन्या, नागरिक यांना भूरळ पाडण्यासाठी सोनवणे हा शहरातील उच्चभ्रू ठिकाणी ऑफीस सुरू करून सेटअप तयार करीत होता. त्याने जस्ट डायलवर देखील आरटीओ एजंट म्हणून नोंद केली होती. जस्ट डायलवरून त्याला कामे मिळत होती.
त्याने आरटीओतील कामे करून देण्याचे सांगून फि स्वरुपात अनेक लोकांकडून पैसे उकळले आहेत. आरोपीचा शोध सुरू असतानाच पोलीस अंमलदार योगेश जगताप यांना माहिती मिळाली की, सोनवणे हा रास्ता पेठ परिसरातील पॉवर हाऊस येथे येणार आहे.
त्यानूसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून सोनवणे याला ताब्यात घेण्यात आले.