नगर -महापालिकेने मालमत्ता करावर 75 टक्के शास्ती माफी जाहीर केलेली आहे. ही शास्ती माफी केवळ नोव्हेंबर महिन्यापूर्तीच मर्यादीत न ठेवता शास्ती माफीची मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने मनपा आयुक्त श्रीकांत मायकलवार यांच्याकडे केली.
यावेळी शहर प्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, माजी महापौर भगवान फुलसौंदर उपस्थित होते. महापालिकेने मालमत्ता करावर ची शास्ती माफी दिल्यामुळे नागरिकांनी महापालिकेत मोठ्या प्रमाणावर आपले मालमत्ता कर जमा केले आहेत. ज्या नागरिकांनी कर भरण्यासाठी गर्दी पाहून करोनाच्या भीतीने आत्तापर्यंत मालमत्ता कर भरलेला नाही, त्या नागरिकांसाठी महापालिकेने मुदत वाढवून द्यावी.
यामध्ये महापालिकेत आर्थिक दृष्ट्या चांगल्याप्रकारे रक्कम जमा होऊन, महापालिकेचे कामे चांगल्या प्रकारे मार्गी लावता येतील. या मागणीनंतर आयुक्त म्हणाले उद्या यावर निर्णय घेऊन मुदत वाढवण्यात येईल जेणेकरून नागरिकांना आपला मालमत्ता कर भरता येईल, आणि यामुळे करोना चा संसर्ग नगरमध्ये वाढणार नाही, असे आयुक्त म्हणाले.