राकेश वाधवन यांच्या कोठडीत वाढ

मुंबई – पीएमसी बॅंकतील 4 हजार 355 कोटी रुपयांच्या घोटाळाप्रकरणी अटक करण्यात आलेल्या एचएीआयएलचे चेअरमन राकेश वाधवन आणि त्यांच्या मुलगा सारंग वाधवन पोलीस कोठडीत 14 ऑक्‍टोबरपर्यत वाढ करण्यात आली आहे.

या दोघांच्या कोठडीची मुदत संपली असता त्यांना आज न्यायालयात हजर केले असता त्यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली. या दोघांना 8गतआठवड्यात गुरुवारी अटक करण्यात आली होती. तसेच पीएमसी बॅंकेचे माजी अध्यक्ष वाऱ्याम सिंग यांनाही शनिवारी अटक करण्यात आली.

या तिघांना मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी अतिरिक्‍त मुख्य महानगर दंडाधिकारी ए. जी. शेख यांच्यासमोर हजर करण्यात आले. या सुनावणीवेळी मुंबई पोलिसांनी घोटाळाप्रकरणी अधिक चौकशी करण्यासाठी आरोपिंच्या कोठडीत वाढ करण्यात यावी, अशी मागणी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.