शिरूर- शहरात महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार कम्युनिटी क्लिनिक सुरू करण्यात आली आहे. यामध्ये उपचार करणारे डॉक्टर शिरुर शहरातील नामांकित डॉक्टर असून सर्दी, खोकला, ताप, घसा, दुखणे अशा आजारांवर या ठिकाणी मोफत उपचार मिळणार आहे, त्याचा लाभ शिरूर शहरातील नागरिकांनी घ्यावा. येथे या आजारावरील औषधे ही मोफत मिळणार आहेत.
शहरातील 24 डॉक्टरांची नेमणूक करण्यात आल्याची माहिती आपत्कालीन व्यवस्थापन समिती प्रमुख तहसीलदार लैला शेख यांनी दिली. शिरूर शहरात एकूण सात झोपडपट्टी असून यातही लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. करोना संसर्ग आधाराच्या पादुर्भाव या ठिकाणी होऊ नये व येथील नागरिकांना वरील आजारांवर त्वरित तपासणी व या आधारांवर औषधे मिळावी यासाठी नगरपरिषदेने सर्वतोपरी औषधे उपलब्ध करावी, असे तहसीलदार शेख यांनी सांगितले. तसेच नगरपरिषदेने सकाळी 10 ते 12 या वेळेत हे कम्युनिटी हेल्थ क्लिनिक सुरू ठेवावे, असेही तहसीलदार शेख यांनी नमूद केले.