शिरूर ः उरळगाव (ता. शिरूर) या मतदान केंद्रावर इव्हीएम मशीन बंद पडल्याने मतदारांना एक तास ताटकळत थांबावे लागले. रांजणगाव सांडस, आलेगाव पागा, आरणगाव, दहिवडी, पारवडी, राक्षेवाडी, शिवतक्रार म्हाळुंगी या शिरूर तालुक्यातील पूर्व भागातील मतदारांची संख्या सकाळच्या टप्प्यात कमी होती. मात्र, दुपारनंतर मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, उरळगावात इव्हीएम मशीनच बंद पडल्याने मतदारांना एक तासभर थांबावे लागले. तासाभराने नवीन मशीन आणले गेल्यावर येथील मतदान प्रक्रिया पुन्हा सुरळीत सुरू झाली.