कुल यांनी राहूत, थोरात यांनी खुटबाव येथे बजावला मतदानाचा हक्क
यवत- राज्यात आज सर्वत्र एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया पार पडत असून, दौंड विधानसभा निवडणुकीचे उमेदवार भाजपचे राहुल कुल, राष्ट्रवादीचे रमेश थोरात, वंचित बहुजन आघाडीचे तात्यासाहेब ताम्हाणे यांनी आपल्या गावच्या ठिकाणच्या मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.
आज सकाळी 7:30 वाजता भाजपाचे उमेदवार राहुल कुल यांनी राहू येथील कैलास विद्या मंदिरातील मतदान केंद्रावर पत्नी कांचन कुल, आई माजी आमदार रंजना कुल यांच्यासह मतदानाचा हक्क बजावला. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार रमेश थोरात यांनी खुटबाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावर पत्नी मंगल थोरात, मुलगा गणेश थोरात आणि इतर कुटुंबियांसह मतदानाचा हक्क बजावला, तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार दत्तात्रय ऊर्फ तात्यासाहेब ताम्हाणे यांनी भरतगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावर सकाळी पत्नीसह मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले.
- भारतीयय जनता पक्षाने माझ्यावर विश्वास टाकून मला उमेदवारी दिली. मी आशावादी आहे की, मला मतदार पुन्हा विधानसभेत जाण्याची संधी देतील.
राहुल कुल, भाजपचे उमेदवार - मला स्वतःला या निवडणुकीचे आव्हान वाटत नाही. ही निवडणूक जनतेनी हातात घेतली असून, माझा विजय निश्चित आहे.
– रमेश थोरात, राष्ट्रवादी कॉंग्रेस