भोर- खानापूर (ता. भोर) येथील मतदान केंद्रातील व्हीव्हीपॅट मशिन काही काळ बंद पडल्याने या ठिकाणी मतदारांच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या होत्या. सकाळी 10 वाजून 21 मिनिटांनी या मतदार केंद्रावर मशीन बंद पडले, त्यानंतर मतदान प्रक्रिया थांबवण्यात आली. झोनल ऑफिसर अनिल लांडगे यांनी त्यानंतर 15 मिनिटांत दुसरे मशीन आणून बसवले आणि त्यानंतर पुन्हा मतदान प्रक्रिया सुरू झाले. मात्र, या पंधरा मिनिटांच्या काळात मतदारांच्या रांगेत वाढ झालेली दिसून आली.