वॉशिंग्टन – गेल्या काही वर्षांमध्ये आधुनिक जीवनशैलीचा अंगीकार केल्यामुळे जागतिक स्तरावर सर्वत्रच मद्यपानाचे प्रमाण वाढले आहे आता जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारी प्रमाणे दरवर्षी केवळ मद्य पानामुळे तीस लाख लोकांचा मृत्यू होतो एका वर्षामध्ये जगात मृत्यू पडलेल्या सर्व लोकांचा विचार करता त्यापैकी 5.3% मृत्यू फक्त मद्यपानामुळे होतात असे जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या अहवालात म्हटले आहे या माहितीप्रमाणे मद्यपानामुळे 200 प्रकारचे विविध आजार व्यक्तीला होऊ शकतात.
जागतिक स्तरावर पुरुषांमध्ये मद्यपान घेण्याचे सरासरी प्रमाण 20 लिटर असून महिलांमध्ये हे प्रमाण सात लिटर एवढे आहे सायकॉलॉजी टुडे या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या लेखाप्रमाणे मद्यपानामुळे व्यक्तीला आभासी दुनियेत जाता येते गेल्या काही वर्षांमध्ये त्याचे प्रमाण वाढले आहे प्राथमिक अवस्थेत केवळ मजा म्हणून मद्यपानाचा आनंद घेणारे नंतर व्यसनी होऊ शकतात असा इशाराही जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे मद्य घेतल्यामुळेआपल्याला खूप चांगले वाटते आणि आपल्या सगळ्या समस्या सुटू शकतात अशा आभासी कल्पनेमुळे तरुण पिढीमध्ये सुद्धा मद्यपानाचे प्रमाण वाढले आहे.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अल्कोहोलिक अब्युज या संस्थेने दिलेल्या माहितीप्रमाणे मानवी शरीरामध्ये 70 टक्के पेक्षा जास्त पाण्याचे प्रमाण आहे आणि मद्यातील अल्कोहोल या शरीरातील पाण्यामध्ये सहजपणे विरघळत असल्याने वीस मिनिटांमध्येच अल्कोहोल मनाचा आणि मेंदूचा ताबा घेते मानवी शरीरामध्ये हालचालींचे नियंत्रण करणारे जे न्यूरो ट्रान्समीटर्स आहेत त्यावर अल्कोहोलचा प्रभाव होतो न्यूरो ट्रान्समिटरच्या माध्यमातून माणसाचे चालणे माणसाचे बोलणे नियंत्रित आणि हालचाली नियंत्रित केल्या जात असततात.
पण अल्कोहोलमुळे या न्यूरोट्रान्समीटरवरच परिणाम होत असल्याने मद्यपानानंतर माणसांच्या हालचालीही बदलतात आणि बोलणे आणि चालणे ही बदलते चांगल्या आरोग्यासाठी नियंत्रित प्रमाणात मद्यपान करणे चांगले असते अशा प्रकारच्या जाहिराती जरी केल्या जात असल्या तरी आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीप्रमाणे अशा प्रकारे मद्यपनाला सुरुवात केलेल्यांचा शेवट नंतर व्यसनी लोकांपर्यंत होऊ शकतो.