US B-1 Lancer Bomber : अमेरिकन हवाई दलाचे बी-१२ लान्सर बॉम्बर लँडिंग करताना अचानक क्रॅश झाल्याची माहिती समोर आली आहे. इंग्रजी वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, साउथ डकोटा येथील एल्सवर्थ एअर फोर्स बेसवर हा अपघात झाला, जेव्हा क्रू मेंबर्स ट्रेनिंग करत होते. मात्र, या अपघातात बी-१ लान्सर बॉम्बरमध्ये बसलेले चारही क्रू मेंबर्स सुरक्षित आहेत.
अमेरिकेच्या हवाई दलाने ही माहिती दिली. यावर फ्लाय झोनच्या स्थितीची नोंद ठेवणाऱ्या एजन्सीने सांगितले की, अपघाताच्या वेळी आकाशातील दृश्यमानता खूपच कमी होती आणि तापमानही खूप कमी होते. साऊथ डकोटा येथे झालेल्या अपघातानंतर अमेरिकेच्या हवाई दलाने या अपघाताच्या चौकशीसाठी एक टीम तयार करण्यात आल्याची माहिती दिली. अपघातामागचे मुख्य कारण काय होते याची माहिती लवकरच मिळेल.
B-1 हे एक पारंपारिक सुपरसॉनिक बॉम्बर आहे, जे पहिल्यांदा 1980 च्या दशकात यूएस एअर फोर्सच्या सेवेत दाखल झाले. हे आशिया-पॅसिफिक प्रदेशात यूएस एअर फोर्सद्वारे वापरले जाते. याशिवाय अफगाणिस्तानात अमेरिकेला क्लोज एअर सपोर्ट मिशन चालवावे लागले. मात्र, हा बॉम्बर अण्वस्त्रांचा वापर करत नाही.
सुरुवातीच्या टप्प्यात बी-1 लान्सर बॉम्बरची संख्या 100 च्या आसपास होती. तथापि, आज 60 पेक्षा कमी B-1 लान्सर बॉम्बर्स टेक्सासमधील डायस एअर फोर्स बेस आणि एल्सवर्थ एअर फोर्स बेस येथे हवाई दलाच्या सेवेत आहेत.