नवी दिल्ली – दरवर्षी, किमान ४० दशलक्ष महिलांना बाळंतपणामुळे दीर्घकालीन आरोग्य समस्या उद्भवण्याची शक्यता असते, असे द लॅन्सेट ग्लोबल हेल्थ जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या नवीन अभ्यासात आढळून आले आहे.
संशोधकांना असे आढळून आले की लैंगिक संभोगाच्या वेळी वेदना जाणवणे या लक्षणांमुळे अशा प्रसूतीनंतरच्या महिलांपैकी एक तृतीयांश (३५टक्के) प्रभावित होतात, तर यापैकी ३२टक्के स्त्रियांना पाठदुखीचा त्रास होतो.
प्रसूतीनंतर स्त्रियांना प्रभावित करणाऱ्या इतर लक्षणांमध्ये अनैच्छिक लघवी (8-31 टक्के), चिंता (9-24 टक्के), नैराश्य (11-17 टक्के) आणि पेरिनेल वेदना (11 टक्के) यांचा समावेश होतो, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या संशोधकांच्या आंतरराष्ट्रीय पथकाने त्यांच्या अभ्यासात म्हटले आहे.
त्यांच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की प्रसूतीनंतरच्या परिस्थितीचा त्रास जन्म दिल्यानंतर काही महिन्यांपर्यंत किंवा वर्षांमध्येही कायम राहतो. गर्भधारणेदरम्यान आणि बाळंतपणादरम्यान महिलांच्या आरोग्याची नीट काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे असेही या अहवालात म्हटले आहे.
अनेक कमी-उत्पन्न आणि मध्यम-उत्पन्न असलेल्या देशांमध्ये माता मत्युचे प्रमाण अधिक असते असाही संशोधकांचा निष्कर्ष आहे. प्रसूतीनंतरच्या परिस्थितींमुळे स्त्रियांच्या दैनंदिन जीवनात, भावनिक आणि शारीरिक अशा दोन्ही पातळ्यांवर खूप त्रास होतो, पण त्याकडे कमी लक्ष दिले जाते आणि त्या विषयीच्या तक्रारी नोंदवल्याच जात नाहीत.