मुंबई/नवी दिल्ली – ट्विटरचे सहसंस्थापक जॅक डॉर्सी यांनीच केवळ नवे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग अग्रवाल यांना उच्च श्रेणी दिली असे नव्हे तर, त्यांच्या शिक्षकांनाही हा कुणीतरी खास असे जाणवत होते.
पराग ज्यावेळी जेईई परीक्षा देत होते, त्यावेळी त्यांना येत असलेली उत्तर त्यांनी पहिल्या 40 मिनिटांत सोडवली. त्यानंतर ते पुरवणी मागण्यासाठी गेले. मात्र पुरवणी देण्याची तरतूद नसल्याचे पर्यवेक्षकांनी सांगितले. त्यावर परत येऊन सूचना वाचल्या.
त्यात आपल्या पुरवण्या योग्य क्रमाने आणि निट बांधा, असे लिहले होते. त्या दाखवून त्याने पुरवणी देण्याच आग्रह धरला. त्यानंतर मात्र विनाकारण वेळ वाया गेला असे सांगत तो अस्वस्थ झाला होता, असे त्यांना जेईईचे प्रशिक्षण देणारे प्रवीण त्यागी यांनी सांगितले.
अग्रवाल यांनी आयआयटी प्रवेश परीक्षेत 77 वा क्रमांक पटकावला होता. त्यांनी मुंबई आयआयटीमध्ये कंम्युटर सायन्स हा विभाग निवडला. या विभागाचे माजी प्रमुख सुप्रतीम बिश्वास सांगतात, त्याने माझ्यासोबत दोन कोर्स पूर्ण केले. मला जर निट आठवत असेल तर तो प्रथम क्रमांकाने पदवीधर झाला होता.
आयआयटीतून पदवी घेतल्यानंतर पराग हे स्टॅडफोर्डला कंप्युटरमध्ये पीएच. डी करण्यासाठी गेल्यामुळे त्यांच्याविषयी अधिक माहिती उपलब्ध होत नाही. अग्रवाल यांची आई शिक्षिका होती. तर वडील चाळीशीत असताना आण्वीक उर्जा विभागात कार्यरत होते.
नव्या सहस्रकाच्या पहिल्या दशकात मायक्रॅसॉफ्ट आणि गुगलचे प्रमुखपद सत्या नडेला आणि सुंदर विचाई यांनी पटकावले. त्यानंतर या मायक्रो ब्लॉगिंग व्यासपीठाच्या प्रमुखपदावरुन डोर्सी पायउतार होताना त्यांनी नाव सुचवल्याने प्रमुख पदावर पराग विराजमान झाले.
मायक्रोसॉफ्ट, याहू आणि एटी अँड टी लॅबमध्ये संशोधक म्हणून काम करणाऱ्या अग्रवाल यांनी 2011 मध्ये ट्विटरमध्ये सेवा सुरू केली. मुख्य तांत्रिक अधिकारी या पदावर त्यांची 2017 मध्ये नियुक्ती करण्यात आली. जगभरातील सरकारे आणि नियामकांची डोकेदुखी ठरलेल्या जनतेचे व्यासपीठ असणाऱ्या सोशल मिडिया आणि इंटरनेट क्षेत्रावरील दबाव वाढल्यानंतर व्यापक तंत्रज्ञानाच्या या क्षेत्रात अग्रवाल यांनी भारतीयांच्या अधिकारवाणीवर शिक्कामोर्तब केले.
या पदावर अनेकांनी दावा केला होता. मात्र पदावरून पायउतार होताना डॉर्सी यांच्यासाठी पराग हेच पहिली पसंती होते. त्यांनी परागचे वर्णन कंपनी आणि तिच्या गरजा यांची सखोल जाण असणारा व्यक्ती असे केले आहे.
राग यांच्या व्यक्तीगत आयुष्या विषयी फार माहिती उपलब्ध नसली तरी त्यांचे शिक्षण मुंबईतील आण्विक उर्जा केंद्रीय शाळेत झाले. भांडवली गुंतवणूक सल्लागार विनीता अग्रवाल यांच्याशी ते विवाहबध्द झाले. त्यांच्या ट्विटर हॅंडलवर त्या फिजीशियन आहेत आणि स्टॅंडफोर्ड मेडीसीन येथे प्राध्यापक असल्याचे नमूद केले आहे. या दाम्पत्याला एक मुलगा असून त्याचे नाव अंश आहे. त्याचेही एक ट्विटर हॅंडल आहे.
ट्विटरच्या सर्वोच्च पदी विराजमान केल्याबद्दल डोर्सी यांचे पराग यांनी आभार मानले आहेत. त्यांनी म्हटले आहे, तुमच्यापैकी काही जण मला चांगले ओळखतात तर काही काही थोडे फार आणि काही जण अजिबात ओळखत नाहीत. आपण आपला सुरवातीपासून विचार करू- पहिला टप्पा आपल्या भविष्याचा. मला खात्री आहे तुमच्या मनात खूप सारे प्रश्न आहे.
आपल्या असंक्य गोष्टींवर चर्चा करायची आहे. उद्या एकत्रित आल्यानंतर आपल्याकड प्रश्नोत्तरे आणि चर्चोठी खूप वेळ आहे. खुल्या आणि मुक्त संवादाची ही सुरवात असेम. आपण एक असू अशी मी आशा करतो.