पराग अग्रवाल-सुंदर पिचाईसह ‘या’ भारतीयांच्या हाती डिजिटल जगाची कमान !

नवी दिल्ली : जॅक डोर्सी यांनी सोमवारी ट्विटरच्या सीईओ पदाचा राजीनामा दिल्यानंतर भारतीय वंशाच्या पराग अग्रवाल यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली. सध्याच्या घडीला डिजिटल जगाची कमान भारतीयांच्या हाती आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये ! मायक्रोसॉफ्ट असो की गुगल, अडोब असो की आयबीएम, सर्व कंपन्या भारतीयांच्या इशाऱ्यावर काम करत आहेत. त्यात आता पराग अग्रवाल या नव्या नावाची भर पडली आहे. या यादीत जगभर आपल्या नावाचा डंका वाजविणाऱ्या आणखी कोणकोणत्या भारतीयांचा समावेश आहे, ते जाणून घेऊया.

० पराग अग्रवाल यांची ट्विटरच्या सीईओपदी नियुक्ती
ट्विटरचे सह-संस्थापक, जगातील सर्वात प्रसिद्ध सोशल मीडिया साइट्सपैकी एक जॅक डोर्सी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता त्याची कमान भारतीय वंशाच्या पराग अग्रवाल यांच्या हातात आली आहे. पराग यांची ट्विटरचे नवे सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी पराग अग्रवाल कंपनीत मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (CTO) म्हणून कार्यरत होते. 2011 मध्ये कंपनीत अभियंता म्हणून रुजू झाल्यानंतर त्यांनी सीटीओपर्यंतचा प्रवास केला आणि आता ते सीईओच्या खुर्चीवर विराजमान झाले आहेत. त्यांनी आयआयटी बॉम्बेमधून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे आणि कॅलिफोर्नियाच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठातून पीएचडीचे शिक्षण घेतले आहे.

० गुगलमध्ये सुंदर पिचाई यांचा दबदबा

सुंदर पिचाई हे जगातील सर्वात मोठ्या सर्च इंजिनचे सीईओ आहेत. सुंदर पिचाई यांची 2015 मध्ये गुगल कंपनीचे सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. आज त्यांची प्रत्येक ऑर्डर गुगलमध्ये मानली जाते. सुंदर पिचाई 2004 मध्ये गुगलमध्ये रुजू झाले.

० मायक्रोसॉफ्टची कमान सत्या नाडेला यांच्या हाती
गुगल आणि ट्विटर सोबतच मायक्रोसॉफ्ट या सॉफ्टवेअर कंपनीतही सर्व काही भारतीय वंशाच्या लोकांच्या सांगण्यावरून चालते. भारतीय वंशाचे सत्या नडेला हे मायक्रोसॉफ्टच्या सीईओ पदावरही आहेत. हैदराबादमध्ये जन्मलेल्या नडेला यांची 2014 मध्ये कंपनीचे सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती आणि ते या पदावर कायम आहेत.

० अरविंद कृष्णा आयबीएमचे सीईओ
जगातील प्रसिद्ध संगणक हार्डवेअर कंपनी आयबीएममध्ये (IBM)सीईओ पदाची धुरा भारतीय वंशाचे अरविंद कृष्णा यांच्याकडे आहे. अरविंदचा जन्म आंध्र प्रदेश येथे झाला आणि 2020 मध्ये त्यांना IBM कंपनीचे CEO बनवण्यात आले. शिक्षणाबद्दल बोलायचे झाले तर अरविंद कृष्णा यांनी आयआयटी कानपूरमधून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आहे.

० इतर अनेक मोठ्या नावांचा समावेश
याशिवाय इतरही अनेक भारतीय लोक आहेत जे जगातील मोठ्या कंपन्यांमध्ये सीईओ पदावर बसून भारताचा गौरव करत आहेत. यामध्ये कॅलिफोर्निया स्थित ऍडोबचे (Adobe) चे सीईओ शंतनू नारायण, व्ही एम वेअरचे (VM Wear) चे सीईओ रघु रघुराम यांचा समावेश आहे. आता या यादीत पराग अग्रवालचे नाव सामील होणे ही भारतासाठी निश्चितच मोठ्या कामगिरीपेक्षा कमी नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.