हॉलिवूड ब्लॉकबस्टर ‘अँट-मॅन अँड द वेस्प’ प्रेक्षकांना खूप आवडला आहे. खुशीची गोष्ट म्हणजे चित्रपटाच्या चाहत्यांसाठी या चित्रपटाची अभिनेत्री इव्हंजलीन लिली तिच्या काही छायाचित्रे घेऊन भारतात आली आहे. तिचे फोटो नुकतेच सोशल मीडियावर पाहिले गेले आहेत. हे फोटो नवी दिल्लीचे आहेत. यातूनच लक्षात येते आहे की इव्हंजलीन भारत भेटीवर येऊन गेली. ऐतिहासिक स्मारकांना भेटी देण्याच्या आपल्या छंदाचा पुरेपूर आनंद भारत भेटीवर घ्यायचे तिने ठरवले आहे.
इव्हेंजलाइन दिल्लीच्या जगप्रसिद्ध स्मारकांना भेट देत आहे आणि तिची छायाचित्रे शेअर करून आपल्या चाहत्यांना त्यांच्या भारत भेटीबद्दल माहिती देत आहे. इव्हंजलीनने रविवारी हुमायूंची कबर नवी दिल्लीतील उग्रसेन की बाओली या लोकप्रिय वारशाचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले.
लिलीने ब्रिटिश कोलंबियाच्या ऍबॉट्सफोर्डमधून पदवी प्राप्त केली. ती फुटबॉलही खेळली आणि विद्यार्थी परिषदेच्या उपाध्यक्षा होती. कॉलेजमध्ये असताना तिने वेट्रेस म्हणून काम केले, मोठ्या बदललेल्या ट्रकवर “ऑईल’ आणि “ग्रीस’ बदलण्याचाही जॉब केला आणि त्यानंतर रॉयल एअरलाइन्सच्या शिकवणीसाठी पैसे भरण्यासाठी फ्लाइट अटेंडंट म्हणून काम केले.
‘अँट मॅन अँड द वेस्प’च्या चौथ्या फेजमध्ये मार्व्हलने इव्हंजलीनचा समावेश केला नाही. त्यामुले तिच्या भविष्यातील प्रोजेक्टबाबत सध्या काहीच माहिती उपलब्ध नाही. भारत भेटीवर असतानाही तिने आपल्या पुढच्या प्रोजेक्टबाबत काही माहिती दिली नाही. “हर्ट द लॉकर’ मध्ये कोनी जेम्स आणि “रिअल स्टीट’मधे बेली टॅलेटचा तिने केलेला रोलही तसेच “द हॉबिट’ सिरीजमधील टॉरियलचा रोलही खूप गाजला होता.