श्रीनगर: राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी काल (दि. २८) युरोपियन संसद सदस्यांच्या शिष्टमंडळाना संबोधित केले. युरोपियन युनियनचे २८ सदस्यांचे शिष्टमंडळ भारत दौऱ्यावर आले आहे.
काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्यानंतर तेथील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी हे शिष्टमंडळ भारत आले आहे. दरम्यान युरोपियन युनियन संसदेच्या सदस्यांच्या शिष्टमंडळाने आज श्रीनगर येथे जीओसी 15 कोर्प्स, लेफ्टनंट जनरल केजेएस ढिल्लन यांची भेट घेतली. तसेच त्यांनी श्रीनगरमधील दल तलावाला भेट दिली.