युरोपा लीग फुटबॉल स्पर्धा : मॅंचेस्टर, मिलान उपांत्यपूर्व फेरीत

बर्लिन – मॅंचेस्टर युनायटेड व इंटर मिलान संघांनी आपापले सामने जिंकत युरोपा लीग फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. करोनाचा धोका अद्याप कायम असल्याने या स्पर्धेतील सामने पाहण्यासाठी प्रेक्षकांना प्रवेश नाकारण्यात आला होता.

मॅंचेस्टरने लास्क लिंज संघाचा 2-1 असा सहज पराभव केला. या सामन्यात फिलीप विसिंगरने 55 व्या मिनिटाला गोल करत लिंजला आघाडी मिळवून दिली होती. मात्र, मॅंचेस्टरच्या जेसी लिंगार्डने 57 व्या मिनिटाला गोल केला व संघाला बरोबरी साधून दिली. त्यानंतरही मॅंचेस्टरनेच वर्चस्व राखले व बचाव अभेद्य असल्याचे सिद्ध केले. सामना संपण्यापूर्वी 88 व्या मिनिटाला अँथनी मार्शलने गोल केला व मॅंचेस्टरला विजय प्राप्त करून दिला.

दुसऱ्या लढतीत इंटर मिलानने गेटेफ संघावर 2-0 अशी मात केली व उपांत्यपूर्व फेरी गाठली. या सामन्यात इंटक मिलानकडून रोमेलू लुकाकू व ख्रिस्तियन एरिक्‍सन यांनी गोल केले. गेटेफ संघाला गोल करण्याची एकही संधी मिळाली नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.