राजकोट – गुजरातमध्ये रविवारी भूकंपाचे धक्के जाणवले. गुजरातमधील राजकोटपासून 270 किमी उत्तर-वायव्येस दुपारी 3:21 वाजता 4.3 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. त्याचे केंद्र पाकिस्तानमध्ये सुमारे 10 किमी खोलीवर होते.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने याबाबत माहिती दिली आहे. याशिवाय अफगाणिस्तानातही भूकंपाचे धक्के जाणवले. त्याची तीव्रताही 4.3 मोजली गेली.
#AjitPawar : पवारांचा निवडणूक आयोगाला सवाल, म्हणाले “मनसेच्या आमदाराने पक्षावर दावा केला तर..”
फैजाबादच्या दक्षिणेस 117 किमी अंतरावर भूकंप झाला. दुपारी 1.30 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. त्याचे केंद्र जमिनीपासून सुमारे 70 किलोमीटर खोल होते. सध्या कोणत्याही प्रकारच्या नुकसानीचे वृत्त नाही.