नगर – कोव्हीड 19 चा संसर्ग रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाउन असताना या कालावधीत अडचणींवर मात करत महावितरणच्या नाशिक परिमंडळ कार्यालय अंतर्गत असलेल्या पायाभूत आराखडा विभागाने कार्यतत्परता दाखवीत पुढाकार घेऊन नगर मंडळात कोकमठाण या उपकेंद्राची उभारणी तसेच सूतगिरणी उपकेंद्रांतील नुतनीकरण करण्यात आले.
आयपीडीएस योजनेअंतर्गत नाशिक शहरातील अंबड व पंचक तसेच नगर मंडळातील सूतगिरणी या 33/11 केव्ही विद्युत उपकेंद्रातील पॉवर ट्रान्सफार्मरची 5 एमव्हीए वरून 10 एमव्हीए क्षमता वाढ करण्यात आली. त्यामुळे या भागातील ग्राहकांना आणखी योग्य दाबाने व अखंडित वीजपुरवठा मिळण्यास मदत होणार आहे.
नगर मंडळातील कोपरगाव उपविभागाअंतर्गत पायाभूत आराखडा 2 योजने अंतर्गत 1 कोटी 92 लाख रुपये खर्च करून 33/11 केव्ही कोकमठाण नवीन उपकेंद्र उभारण्यात आले आहे. त्यामुळे औद्योगिक ग्राहकासोबत कोकमठाण, जेऊर व कुंभारी गावातील ग्राहकांना पूर्ण क्षमतेने वीजपुरवठा होणार आहे.
श्रीरामपूर विभागातील सूतगिरणी या 33/11 केव्ही उपकेंद्रातील उपकेंद्रातील पॉवर ट्रान्सफार्मरची क्षमता 5 एमव्हीए वरून 10 एमव्हीए केली आहे.
सोबतच खूप जुने असलेल्या या उपकेंद्राचा चेहरामोहरा बदलून नुतनीकरण करण्यात आले असून सुरक्षित व स्वच्छ उपकेंद्र निर्माण करण्यात आली. हा आराखडा विभागाचे अधीक्षक अभियंता संजय खंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली पायाभूत आराखडा विभागातील अभियंते व संबंधित एजन्सी यांनी पूर्ण केली आहेत.