पुणे – रोटरी क्लबच्या 117 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब पुणे नांदेड सिटी शाखेची स्थापना करण्यात आली. यावेळी रोटरीचे प्रांतपाल पंकज शहा, रोटरी क्लब पुणे सारसबागचे अध्यक्ष राजेंद्र सातळकर, रोटरी क्लब डायरेक्टर सुरेश शिंदे, रोटरी प्रांत संचालक शीतल शहा आदी मान्यवर उपस्थित होते.
नांदेड सिटी क्लबच्या अध्यक्षपदी अतुल कार्ले, यांची तर सचिवपदी सुरेश जगताप आणि खजिनदार पदावर रविराज डोंगरे यांची नियुक्ती यावेळी करण्यात आली. संस्थापक संचालक शेखर वाल्हेकर, सभासद संचालक बी. एल. स्वामी यांची यावेळी उपस्थिती होती.
नांदेड सिटी शाखा स्थापन करण्यात संजय साताळकर यांचा विशेष पुढाकार आणि परिश्रम होते. रोटरीची ही पुणे जिल्ह्यातील 141 वी शाखा असून, आगामी काळात या नांदेड सिटी शाखेचा टॉप 10 शाखांमध्ये समावेश असेल, असा विश्वास यावेळी सातळकर यांनी व्यक्त केला. नव्या क्लबच्या सल्लागारपदाची धुराही त्यांच्यावरच सोपवण्यात आली आहे.
अत्यंत उत्साही आणि प्रसन्न वातावरणात या नव्या क्लबची स्थापना झाली असून, यावेळी नूतन 32 सभासद उपस्थित होते. नांदेड सिटी क्लबच्या या स्थापनेबद्दल मान्यवरांनी सगळ्यांचे अभिनंदन केले असून क्लबच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.