EPFOचा मोठा निर्णय ! सरकारने निश्चित केले यंदाचे PFवरील व्याजदर, जाणून घ्या

नवी दिल्ली – ईपीएफओ (EPFO) ने देशातील ६ कोटी लोकांना मोठा दिलासा दिला आहे. पीएफवर मिळणाऱ्या व्याज दरामध्ये कोणताही बदल केलेला नाही. तुम्हाला या वित्तीय वर्षात सुद्दा 8.5 टक्के (EPFO fixes PF interest rates) च्या दराने व्याज मिळेल. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या श्रीनगर बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला आहे.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना प्रत्येक आर्थिक वर्षासाठी पीएफ रकमेवर व्याज दर जाहीर करते. गेल्या वर्षी मार्चमध्ये ईपीएफओने व्याजदर कमी करून 8.5 टक्क्यांवर आणला. त्याचबरोबर 2019-20 साठी पीएफवरील व्याज दर 2012-13 नंतर सर्वात निम्न पातळीवर आला होता.

पहिल्यांदा ही येत होती बातमी
पहिल्यांदा बातमी येत होती की, यंदा सरकार पीएफच्या व्याज दरात कपात करु शकते. कारण देशात पसरलेल्या कोरोनाच्या संकटामुळे या वर्षी सरकार नोकरी करणाऱ्या लोकांना झटका देऊ शकते. परंतु सरकारने व्याज दरात कोणत्याही प्रकारचा बदल केलेला नाही. जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर येथे ईपीएफच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाची बैठक पार पडली. केंद्रीय कामगार आणि रोजगार (स्वतंत्र प्रभार) राज्यमंत्री संतोष कुमार गंगवार या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.

तसेच शनिवारी जाहीर झालेल्या वेतनपट आकडेवारीनुसार नवीन नोंदणी धारकांची संख्या डिसेंबरमध्ये 24 टक्क्यांनी वाढून 12.54 लाखांवर गेली आहे. नोव्हेंबर 2020 च्या तुलनेत ही वाढ 44 टक्के जास्त आहे. या आकडेवारीवरून कोविड -19 च्या दरम्यानच्या औपचारिक क्षेत्रातील रोजगाराची स्थिती सूचित होते. कामगार मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ईपीएफओच्या वेतनाच्या आकडेवारीनुसार, डिसेंबर 2020 मध्ये 12.54 लाख खातेदार निव्वळ आधारावर वाढले, हे एक चांगले संकेत आहेत.

आतापर्यंत किती राहिला पीएफवर व्याज दर

> 2020-21 – 8.5 टक्के
> 2019-20 – 8.5 टक्के
> 2018-19 – 8.65 टक्के
> 2017-18 – 8.55 टक्के
> 2016-17 – 8.65 टक्के
> 2015-16 – 8.8 टक्के
> 2013-14 – 8.75 टक्के

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.