Interest Rate on PF। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने सहा कोटींहून अधिक पीएफ खातेधारकांना मोठी भेट दिली आहे. EPFO ने 2023-24 साठी EPF वर व्याजदर वाढवलाय. EPFO सदस्यांना 2023-24 या आर्थिक वर्षात भविष्य निर्वाह निधीवर 8.25 टक्के दराने व्याज मिळेल. आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी ईपीएफचा व्याजदर ८.१५ टक्के निश्चित करण्यात आला होता. 2021-22 मध्ये हा दर 8.10 टक्के होता.
केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या बैठकीत निर्णय Interest Rate on PF।
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफपी) सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीच्या (सीबीटी) बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार 2023-24 साठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) खात्यांसाठी 8.25 टक्के व्याजदर निश्चित केला आहे, अशी माहिती एका वृत्तसंस्थेने दिली.
6 कोटींहून अधिक ग्राहक सरकारी सेवानिवृत्ती निधीशी संबंधित आहेत. केंद्रीय अर्थ मंत्रालय शिफारस केलेल्या दराचा विचार करून अंतिम व्याजदर अधिसूचित करते. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खात्यावरील व्याज आर्थिक वर्षाच्या 31 मार्चपूर्वी मिळते. म्हणजेच त्याची गणना मासिक आधारावर केली जाते.
हेही वाचा
अर्थमंत्र्यांची लोकसभेत श्वेतपत्रिका सादर; कोळसा, २जी, कॉमनवेल्थ घोटाळ्याचा उल्लेख
आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये वितरणासाठी 90,497.57 कोटी रुपयांचे निव्वळ उत्पन्न उपलब्ध होते. आता सभासदांच्या खात्यात व्याज जमा केल्यानंतर 663.91 कोटी रुपये शिल्लक राहण्याचा अंदाज आहे.
कर्मचाऱ्यांचे योगदान Interest Rate on PF।
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी 20 किंवा अधिक कर्मचारी असलेल्या संस्थांमध्ये पगारदार कर्मचाऱ्यांसाठी अनिवार्य योगदान आहे. EPF आणि MP कायद्यांतर्गत, एक कर्मचारी त्याच्या पगाराच्या 12 टक्के रक्कम मासिक आधारावर EPF खात्यात जमा करतो. कंपनीद्वारे त्याचे योगदान दिले जाते.
2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सत्तेवर आल्यापासून, EPF व्याजदर 8.10% पासून ते आता 8.80% च्या दरम्यान आहे.