मुंंबई – स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच ‘प्रेमाची गोष्ट’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेत अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि राज हंचनाळे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याआधी तेजश्रीने ‘होणार सून मी या घरची’, ‘अग्गबाई सासूबाई’ या मालिकांमध्ये काम केले आहे. या मालिकेतील तिच्या भूमिकेला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. त्यानंतर आता ती पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. विशेष म्हणजे राज आणि तेजश्रीसह या मालिकेत अपूर्वा नेमळेकर देखील झळकणार आहे.
काही दिवसांपूर्वी या मालिकेचा प्रोमो आऊट झाला होता. शुभांगी गोखले, तेजश्री आणि राज दिसले होते. त्यानंतर आता या मालिकेचा आणखी प्रोमो आऊट झाला आहे. या प्रोमोमध्ये अपूर्वा नेमळेकरचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळाला आहे. सावनी असे तिच्या भूमिकेचे नाव आहे. याआधी देखील अपूर्वाने काही मालिकांमध्ये खलनायिकेची भूमिका केली आहे. शेवंता या पात्रामुळे अपूर्वाला अधिक लोकप्रियता मिळाली.
या भूमिकेबाबत अपूर्वा म्हणाली की, “सावनी अतिशय ग्लॅमरस असल्याने साड्यांपासून ते तिच्या दागिन्यांपर्यंत सगळं खास असणार आहे. मी आजवर साकारलेल्या भूमिकांपेक्षा अतिशय वेगळी अशी ही भूमिका आहे.” यावेळी तिने प्रेक्षकांनी प्रत्येक कामात मला मोलाची साथ दिली आहे. हीच साथ आणि प्रेम माझ्या नव्या मालिकेलाही मिळेल याची खात्री आहे”, असा विश्वासही व्यक्त केला.
View this post on Instagram
दरम्यान, ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका 4 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. प्रेमाची गोष्ट या मालिकेत चिमुकल्या सईसाठी दोन वेगळ्या स्वभावाचे मुक्ता अर्थात तेजश्री आणि सागर (राज) कसे एकत्र येतात. त्यांच्या प्रेम कसे बहरते हे दाखवण्यात येणार आहे.