कार्ला, दि. 8 (वार्ताहर)-मावळ तालुक्यातील ऐतिहासिक संदर्भ असलेल्या कार्लानगरीला इंग्लडच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी (दि.7) भेट दिली. कार्ला येथे 1779 मध्ये झालेल्या इंग्रज आणि मराठ्यांच्या लढाईत मारला गेलेल्या इंग्रज सेनापतीच्या स्तंभाची पाहणी केली. त्याकाळात झालेल्या ऐतिहासिक घटनेविषयी माहिती घेतली. या शिष्टमंडळात इंग्रज सेनादलाचे सेवानिवृत्त कर्नल पॅट्रीक्स यांच्यासह एकूण 15 सदस्यांचा समावेश होता.
मावळ तालुक्यातील ऐतिहासिक संदर्भ असलेल्या कार्लानगरीला इंग्लडच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी (दि.7) भेट दिली. कार्ला येथे 1779 मध्ये झालेल्या इंग्रज आणि मराठ्यांच्या लढाईत मारला गेलेल्या इंग्रज सेनापतीच्या स्तंभाची पाहणी केली. त्याकाळात झालेल्या ऐतिहासिक घटनेविषयी माहिती घेतली. या शिष्टमंडळात इंग्रज सेनादलाचे माजी कर्नल पॅट्रीक्स यांच्यासह एकूण 15 सदस्यांचा समावेश होता.
मिळालेल्या माहितीनुसार, 4 जानेवारी 1779 रोजी कार्ला येथील ऐतिहासिक तलावाकाठी मराठे – इंग्रज यांच्यात मोठी लढाई झाली होती. कार्ला या ठिकाणी गनिमी काव्याने लढलेल्या या लढाईत मराठ्यांचा मोठा विजय झाल. तर या लढाईत इंग्रजांचा कथित सेनापती जेम्स स्टुअर्ट (इस्टुर फाकडा) मुख्य लढाईच्या 10 दिवस आधीच कार्ल्यात महादजी शिंदेंच्या फौजेकडून मारला गेला.
माजी ग्रामपंचायत सदस्य भाऊ हुलावळे यांनी शिष्टमंडळाचे स्वागत केले.यावेळी इतिहास अभ्यासक नितिन शास्त्री यांनी कार्ला येथील ऐतिहासिक लढाईची माहिती दिली. तसेच पुढील पिढीला देशात इंग्रजांबरोबर झालेल्या सर्वात मोठ्या लढाईचा व या लढाईत मराठ्यांचा विजय झाला होता, याचे कायम स्मरण राहावे, याकरिता या ठिकाणी उभा राहत असलेल्या विजयस्तंभाविषयी माहिती दिली. कार्ला येथील ऐतिहासिक तळ्याकाठी स्टुअर्ट फाकडांचा स्मृतीस्तंभ आहे. या सर्व ऐतिहासिक घटनेची इंग्लंडच्या दप्तरी नोंद आहे. हा ऐतिहासिक संदर्भ घेत, या शिष्टमंडळाने याठिकाणी भेट दिली. या भेटीदरम्यान इंग्लंडच्या नागरिकांनी ही लढाई व सेनापती जेम्स स्टुअर्ट यांच्याविषयी माहिती जाणून घेत, स्मृतीस्तंभ व ऐतिहासिक तळ्याला भेट दिली. माजी ग्रामपंचायत सदस्य भाऊ हुलावळे यांनी शिष्टमंडळाचे
स्वागत केले.
यावेळी इतिहास अभ्यासक नितिन शास्त्री यांनी या ऐतिहासिक लढाईची माहिती दिली. तसेच या ठिकाणी उभा राहत असलेल्या विजयस्तंभाविषयी माहिती दिली.
इंग्लंडमध्ये आहे नोंद
कार्ला येथील ऐतिहासिक तळ्याकाठी स्टुअर्ट फाकडांचा स्मृतीस्तंभ आहे. या सर्व ऐतिहासिक घटनेची इंग्लंडच्या दप्तरी नोंद आहे. हा ऐतिहासिक संदर्भ घेत, या शिष्टमंडळाने याठिकाणी भेट दिली. या भेटीदरम्यान इंग्लंडच्या नागरिकांनी ही लढाई व सेनापती जेम्स स्टुअर्ट यांच्याविषयी माहिती जाणून घेत, स्मृतीस्तंभ व ऐतिहासकि तळ्याला भेट देत पाहणी केली.