ख्राईस्टचर्च -न्यूझीलंडचा संघ पुढील महिन्यात इंग्लंडचा दौरा करणार आहे. या संघात दुखापतीतून पूर्ण तंदुरुस्त ठरत आयपीएल स्पर्धेतही सरस कामगिरी करत असलेल्या केन विल्यमसनचाही समावेश करण्यात आला आहे. कोपराला झालेल्या दुखापतीमुळे विल्यमसन गेल्या नोव्हेंबर महिन्यापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला नव्हता.
न्यूझीलंड संघ येत्या 2 जूनपासून इंग्लंड दौऱ्यावर जाणार असून या दौऱ्यावर ते कसोटी मालिका खेळणार आहेत. आयसीसीच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा गतविजेता असलेला न्यूझीलंड संघ यंदाच्या स्पर्धेच्या गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे.
आता विल्यमसन संघात परतल्याने त्यांच्या संघाची ताकद वाढली आहे. भारताविरुद्ध मुंबईत झालेल्या कसोटी सामन्यात 10 बळी घेणाऱ्या एजाज पटेलचाही संघात समावेश करण्यात आला आहे. न्यूझीलंडचा पहिला सराव सामना 20 ते 23 मे रोजी आणि दुसरा सराव सामना 26 ते 29 मे रोजी होणार आहे.